प्रांजलमन
नमस्कार, मित्रमैत्रिणींनो तुमचं प्रांजलमन ह्या माझ्या पॉडकास्ट वर स्वागत आहे.
तुमचं मन हे खुप भावनिक असत आणि ते एका विषयावर अडकल की दुसऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बराच वेळ जावा लागतो.
आपण जर मनाच्या खोल खोल गाभाऱ्यात शिरल तर आपल्याला असे बरेच पैलू दिसून येतात की ते विषय आपल्याला बोलायचे असतात पण आपण ते आतल्या आत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे मांडत असतो त्या भावनांना किंवा त्या गोष्टींना शब्द मिळाले की त्याची माळ गुंफून मस्त कविता तयार होते.
तस बघायला गेलं तर आपण प्रत्येक भावनांचे शब्द बनवत नाही. पण थोड्या थोडक्या ज्या काही भावना प्रकट होतात त्या मी मांडते.
कविताच नाही तर आवडलेली गोष्ट पण मी ह्या पॉडकास्ट मधून शब्दरुपी मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
तुम्हाला आवडल तर नक्की सांगा.
धन्यवाद