Society & Culture
भारतातील सर्वाधिक उत्पन्न असणारे आणि जुलुमी निझामाच्या ताब्यात असणारे हैदराबाद संस्थान हे स्वातंत्र्यानंतर सुद्धा स्वतंत्र होतं. हे संस्थान भारतात विलीन झालं ह्या घटनेचं हे अमृत महोत्सवी वर्ष! निझामाच्या प्रचंड जुलुमाला कंटाळलेल्या जनतेने केलेला अभूतपूर्व संग्राम हा अजूनही दुर्लक्षितच आहे. कितीतरी अद्भुत, अविश्वसनीय घटनांचा हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचं काम करणाऱ्या डॉ ऊर्मिला चाकूरकर ह्यांच्यासोबत मारलेल्या गप्पांमधून समोर आलेली ह्या इतिहासाची काही पानं. हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया kool.amol@gmail.com ह्यावर पाठवू शकता.