History
स १३३६ मध्ये वज्रासारख मन आणि पोलादी मनगट असलेल्या हरीहरराय आणि बुक्कराय या दोन भावांनी गोदावरी पासून ते कावेरी पर्यंत एक साम्राज्य उभे केले. तेच ते ‘विजयनगर साम्राज्य‘! कालांतराने या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्यावेळी विजयनगर साम्राज्याची अफाट संपत्ती वाचवण्यासाठी विजयनगरचा शेवटचा सम्राट राजा रामरायाने ही सर्व संपत्ती सोळाशे हत्तींवर लादून एका गुप्त ठिकाणी लपवली.