Arts
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशीच सहज आहार संवाद साधणारं 'आहारमंत्र' प्रत्येक घरात संग्रही असावं असं पुस्तक!
तब्येतीच्या तक्रारींपासून दूर राहणं आणि उत्साहाने - ऊर्जेने कार्यरत राहणं हा आपला प्राधान्यक्रम असतो. त्यासाठीच 'आहारमंत्र' या पुस्तकातून लेखिकेने महत्त्वपूर्ण अशी प्रतिबंधात्मक आहारतत्त्वे उलगडली आहेत. जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता, त्यांना तोंड देण्यासाठी उपचारात्मक आहारातत्त्वे दिली आहेत. आणि मधुमेहींसाठी विशेष विभागात सांगोपांग मांडणी केली आहे.
अयोग्य वेळी, अयोग्य पद्धतीने, अयोग्य प्रमाणात, अयोग्य खाणंपिणं आपल्याला पोषक - रक्षक नाही तर भक्षक ठरतं. हे टाळण्यासाठी 'आहारमंत्र'मध्ये सुयोग्य आहाराचे विविध पैलू सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत.