Arts
डॉ. अनिल अवचट म्हणजे माणसांवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. निर्मळ मनानं निखळ आनंदाचा मार्ग शोधणारा अवलिया लेखक, साहित्यिक, समाजसेवक, डॉक्टर आणि खूप काही. त्यांनी नुकताच आपला निरोप घेतला. दोन वर्षांपूर्वी, अनिल अवचट स्टोरीटेल कट्ट्यावर आले होते. तिथे सागर गोखले यांच्याशी संवाद साधताना वाचनाचे आपल्यावर झालेले संस्कार, वाचनसंस्कृतीविषयीची निरीक्षणे यांची उकल केली होती. आजही ताजा-टवटवीत वाटावा असा हा संवाद, त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन जातो. तत्पूर्वी ऐका, स्टोरीटेलच्या जगात तुमच्यासाठी या आठवड्यात काय काय येतं आहे याविषयी.डॉ . अनिल अवचट यांचे स्टोरीटेल वरील साहित्य (रिपोर्टिंगचे दिवस, कुतूहलापोटी, सुमित्राची संहिता) ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :-https://www.storytel.com/in/en/authors/388856-Anil-Awachatसिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans