।। शरीरी वसे रामायण ।। सौ. मनीषाताई घाडगे

Share:

रामकुटी (Ramkuti)

Religion & Spirituality


।। शरीरी वसे रामायण ।।

जाणतो ना कांही आपण

शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||

आत्मा म्हणजे रामच केवळ,

मन म्हणजे हो सीता निर्मळ !

जागरुकता हा तर लक्ष्मण,

शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||


श्वास, प्राण हा मारुतराया,

फिरतो जगवित आपुली काया |

या आत्म्याचे करीतो रक्षण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||२||


नील जाम्बुवंत रक्त नसा या,

फिरती शोधत जनक तनया