नाते शब्दकळी विजया @rankuti

Share:

रामकुटी (Ramkuti)

Religion & Spirituality


तोडणं असतं सोप्प
जोडून राहणं मात्र अवघड
एकात सहज पडझड
दुसऱ्यात थोडी तडफड...

जीवाला जीव देणं
कोणालाही जमत नाही
कुणी कुणासाठी
उगाचच झुरत नाही....

प्रेम जिव्हाळा माया
असतो नात्याचा पाया
राग रुसवा फुगवा
नातं घट्ट कराया....

थोडेसे अंतर थोडा दुरावा
प्रेमात ओढ लागायला
भांडण आणि तडजोड
नात्यास जिवंतपणा द्यायला....

बोलत रहा रागावत जा
थोडंस रडूनही घ्या
नात्यासाठी कधी कधी
माघार नक्की घेऊन पहा...

नात्यात नेहमी संयम हवा
विश्वास हाच श्वास व्हावा
नसतो कोणीच आयुष्यभर पुरणारा
तरीही नात्यांचा ध्यास न संपणारा....

शब्दकळी विजया
21.7.2025©️®️
9511762351
-------------------------