Society & Culture
पुणे जसं जगात भारी आहे, तसा पुण्यातील गणेशोत्सव देखील जगभरात प्रसिद्ध आहे. चौसष्ट कलांचा आणि चौदा विद्यांचा अधिपती असलेला गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाची सुरूवात याच पुण्यात झाली. ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात दोन दिवस चालणाऱ्या या मिरवणूकीत मानाच्या गणपतींचा थाट आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची आरास नेत्रदिपक असते. याबरोबर पुण्यात अनेक अपरिचीत ऐतिहासिक गणेश मंदिरं आहेत. आजच्या या एपिसोडमध्ये पुण्यातील या सर्व गणपतींचा माहिमा आणि त्यांची वैशिष्ट्ये ऐकूया...