मराठीचा मानबिंदू, गीतरामायण! दत्तप्रसाद जोग ह्यांच्यासोबतच्या गप्पा!

Share:

Listens: 59

गप्पांगण

Society & Culture


गीतरामायण म्हणजे मराठीतलं एक अप्रतिम काव्य. आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग दि माडगूळकर ह्यांची हि रचना श्री सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केल्यानंतर पुणे आकाशवाणीवरून १९५५ मध्ये ह्याच प्रसारण झालं आणि ते घराघरात पोचलं. श्री दत्तप्रसाद जोग ह्यांनी ह्या काव्याचा हिंदीमध्ये अनुवाद केला आहे. काव्य म्हणून गीतरामायण विशेष असं आहे. जोग ह्यांच्यासोबतच्या गप्पांमधून ह्या काव्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे त्यांनी सांगितलं. जोडीला त्याचा हिंदी अनुवाद करताना असणारी आव्हानं, त्याला संगीतबद्ध करताना आलेले छान अनुभव त्यांनी मांडले. गदिमांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या ह्या काव्यात असणारी सौंदर्यस्थळं ह्या गप्पांमध्ये ऐकता येतील. गप्पा कशा वाटल्या ते नक्की सांगा.