कल्याण करी रामराया

Share:

रामकुटी (Ramkuti)

Religion & Spirituality


रामरक्षा सामुहिक पठण ग्रुप तर्फे

सौ मनिषा श. घाडगे


|| कल्याण करी रामराया ||


कल्याण करी रामराया

कल्याण करी रामराया

जनहित विवरी || धृ ||


तळमळ तळमळ होतची आहे

हे जन हाति धरी || १ ||


अपराधी जन चुकतची गेले

तुझा तूचि सावरी || २ ||


कठीण त्यावरी कठीण जाले

आतां न दिसे उरी || ३ ||


कोठे जावे काय करावे

आरंभिली बोहली || ४ ||


दास म्हणे आम्ही केले पावलो

दयेसी नाहीं सरी || ५ ||