Religion & Spirituality
जन्माने कोणीही बौद्ध होत नसतो | तुम्ही खरे बौद्ध आहेत का? | धम्मदीक्षेचे महत्त्व मनुष्य जेव्हा भगवान बुद्धाच्या शिकवणीनुसार म्हणजेच धम्मानुसार जीवन जगण्याचा जेव्हा निश्चय करतो आणि शरणगमन करुन पंचशीलांचा स्वीकार करतो तेव्हाच तो बौद्ध बनतो. एक सामाजिक संकेत म्हणुन बौद्ध दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतल्याने म्हणजेच बौद्ध कुटुंबात जन्मलेल्या मुलामुलींना बौद्ध समजले जात असले तरी, कोणीही जन्माने बौद्ध होत नसतो. म्हणुन धम्मदृष्टीने पाहता केवळ बौद्ध कुटुंबात जन्म झाला आहे म्हणुन त्या मुलामुलींना बौद्ध समजले जाऊ नये. अर्थात त्यांच्यावर धम्माचे शुद्ध संस्कार अवश्य घडवावेत आणि सज्ञान झाल्यावर योग्यायोग्यतेचा विचार करुन ते धम्मदीक्षा घेण्यास तयार होतील अशी तयारी अवश्य करुन घ्यावी व त्यांचा धम्मदीक्षा समारंभ सार्वजनीक ठिकाणी अथवा विहाक़ात आयोजीत करणे आवश्यक आहे. Voice-Over: Sagar Wazarkar Website: marathibuddhism.com