जादूच्या अद्भुत दुनियेची सफर.. जादूगारीण धनश्री सोबत!

Share:

Listens: 18

गप्पांगण

Society & Culture


जादू हि एक प्राचीन कला. त्याच आकर्षण प्रत्येकालाच असतं. गेल्या काही वर्षात ह्या कलेच्या सादरीकरणात खूप बदल झाले आहेत. काय आहेत हे बदल? तुम्हा आम्हाला हि कला शिकता येते का? एखाद्या जादूगाराचं आयुष्य कसं असतं? ह्या आणि अशा अनेक मुद्द्यांवर गप्पा मारायला ह्या भागात आपल्यासोबत आहे जादूगारीण धनश्री देवस्थळी-पावनसकर. आपल्या व्यावसायिक आयुष्याची दिशा पूर्णपणे जादूकडे वळवलेली धनश्री एक यशस्वी जादूगारीण म्हणून वाटचाल करत आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली धनश्री जादूगारांची नवीन पिढी घडवण्याचं काम सुद्धा करत असते. गप्पांगणच्या ह्या भागात जाणून घेऊया तिचा हा जादुई प्रवास.