गप्पा आतापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषकांच्या.. क्रिकेट ब्लॉगर आशुतोष रत्नपारखी सोबत!

Share:

Listens: 66

गप्पांगण

Society & Culture


भारताचा अघोषित राष्ट्रीय खेळ असणाऱ्या क्रिकेटचा विश्वकप सध्या भारतात सुरु आहे. १९७५ पासून काही अपवाद वगळता दर ४ वर्षाला होणारी हि स्पर्धा अत्यंत थरारक अशीच असते. अनिश्चितता हा स्थायीभाव असणारा हा खेळ त्याची पदोपदी जाणीव करून देत असतो. त्यामुळे संपूर्ण सामन्यात एखादी घटना सामन्याचा निकाल पूर्णपणे बदलू शकते हे आपण कित्येकदा पाहिले आहे. अशा कितीतरी घटना प्रत्येक विश्वकप स्पर्धेत जागोजागी आहेत. ह्या सर्व घटनांचा आढावा गप्पांगणच्या ह्या भागात घेतला आहे क्रिकेट ब्लॉगर आशुतोष ह्याने. क्रिकेटचं विश्लेषण खुसखुशीत शैलीत लिहिणाऱ्या आशुतोषने १९८३ पासून ते २०१९ पर्यंतच्या प्रत्येक विश्वकप स्पर्धेत घडलेल्या जवळपास सगळ्या घटना तितक्याच छान शैलीत गप्पांमधून मांडल्या आहेत. त्या जरूर ऐका, कशा वाटल्या ते नक्की कळवा. kool.amol@gmail.com ह्या इमेल वर. धन्यवाद.