Society & Culture
मराठी लोकांची ओळख असणारा गणेशोत्सव हा एकीकडे जगभरात पोचला आणि दुसरीकडे तो दिवसेंदिवस कर्कश्श होत आहे. लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी, दगडूशेट हलवाई आणि इतर अनेकांच्या हा उत्सव सुरु करण्यामागे कोणत्या प्रेरणा होत्या? सुरुवातीच्या काळात हा उत्सव नेमका कसा होता? आज आपण ह्या उत्सावातून काय मिळवतो आहोत, ह्या उत्सवाला आणखी छान कसं करता येईल, चुकीच्या गोष्टींना कसं हद्दपार करावं ह्या आणि अशा अनेक मुद्द्यांवर सार्वजनिक गणेशोत्सवाचा अभ्यासक, पुणे गणेश फेस्टिवल ह्या पुस्तकातून हा उत्सव जगभर पोचवणारा स्वप्नील आणि टिळक चरित्राचा अभ्यासक, इतिहासाच्या पाऊलखुणा ह्या पुस्तकाचा लेखक शुभंकर अत्रे ह्यांच्यासोबत ह्या विषयाच्या अनेक पैलूंवर केलेल्या मनमोकळ्या गप्पांचा हा भाग!