Episode 4 - भारताच्या दृष्टीतून बांग्लादेश

Share:

Listens: 0

Bhartachya Drushtitun भारताच्या दृष्टीतून

Miscellaneous


बातम्यांमध्ये आपण बांगलादेश बद्दल बरंच ऐकत असतो, आणि नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांमध्ये देखील बांगलादेश आणि बांगलादेशींचा उल्लेख आपण बऱ्याच वेळा ऐकला देखील आहे. पण भारतीय माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर बांगलादेश बद्दल काही ठराविक गोष्टीच आपल्या कानावर येतात ज्या मुख्यतः निगेटिव्ह असतात. जस कि बांगलादेशी घुसखोरीचा प्रश्न, असमिया आंदोलन, बांगलादेश मधला वाढता इस्लामी मूलतत्व वाद आणि त्यातून होणाऱ्या अल्पसंख्यांकांच्या कत्तली इत्यादी इत्यादी. पण या पलीकडे देखील बांगलादेश मध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी देखील घडत आहेत ज्या सहसा आपल्या पर्यंत पोहोचत नाहीत. उदाहरणार्थ काही महिन्यांपूर्वी बांगलादेशने पर कॅपिटा जीडीपी मध्ये भारताला मागे टाकल, म्हणजे आता सर्वसाधारणतः बांगलादेशी नागरिकाचं उत्पन्न हे एका भारतीय नागरिकापेक्षा जास्त आहे. तसेच बांगलादेशने मोठ्या प्रमाणात स्तलांतरित झालेल्या रोहिंग्यांचा प्रश्न देखील बऱ्यापैकी मार्गी लावला आहे. पण यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तिथल्या स्थानिक राजकारणाला झुगारून भारतासोबतचे परराष्ट्र संबंध हे अधिक मजबूत केले आहेत, आणि ते येत्या काळात आणखी दृढ होतील.