EPISODE 1 चांगलं असणं आणि सतत उपलब्ध असणं एकच आहे का

Share:

Maya

EPISODE 1 चांगलं असणं आणि सतत उपलब्ध असणं एकच आहे का

Education


काही लोकांना आपली आठवण त्यांच्या अडचणीच्या वेळी हमखास येते. आपण ऐकतो, मदत करतो, वेळ देतो, उपलब्ध राहतो. पण त्यांच्या आनंदाच्या क्षणी आपण तितकेच आठवतो का?

या MAYA च्या पहिल्या नव्या संवादात आपण एका अतिशय साध्या पण खोल प्रश्नाकडे पाहतो — चांगलं असणं आणि सतत उपलब्ध असणं खरंच एकच आहे का?

आपण मदत करतो कारण ती आपली निवड आहे, की कुणाच्या आयुष्यात आपली जागा टिकून राहावी म्हणून? Being needed आणि being valued यात नेमका काय फरक आहे? आणि generosity कधी नकळत expectation किंवा people pleasing मध्ये बदलते?

हा episode कुणाला दोष देण्याबद्दल नाही. उलट, आपण इतरांसाठी काय करतो यापेक्षा ते का करतो, हे थोडं प्रामाणिकपणे पाहण्याबद्दल आहे.

कदाचित या संवादानंतर एक प्रश्न तुमच्यासोबत राहील—

जर उद्या कुणालाही तुमची गरज पडली नाही, तरी तुम्हाला स्वतःची किंमत तितकीच जाणवेल का?

MAYA — मनात राहणारे संवाद

With Snehal R. Singh

माणसं, नाती, मन आणि आपण सहज स्वीकारून बसलेल्या काही गोष्टींकडे थोडं वेगळं पाहणारे Marathi conversations.