Society & Culture
१३ ऑक्टोबर हा भारतीय सिनेमा दिवस म्हणून साजरा होतो. राजा हरिश्चंद्र पासून सुरु झालेली हि फॅक्टरी आता अवाढव्य अशीच झाली आहे. अनेक चढउतार असलेला हा प्रवास कधीच जागतिक झालेला आहे. कसा आहे हा आपला सिनेमा? तो जागतिक मापदंडांवर कितपत उतरतो? ह्या आणि अशा अनेक गोष्टींवर गप्पा मारायला आले होते प्रसिद्ध सिनेसमीक्षक, पटकथाकार, लेखक आणि जागतिक सिनेमाचे अभ्यासक गणेश मतकरी. त्यांच्यासोबत मारलेल्या ह्या मनमुराद गप्पा!