चला कचरा आणि प्लास्टिकमुक्त भविष्याकडे..आदिती देवधर ह्यांच्यासोबतच्या गप्पा!

Share:

Listens: 36

गप्पांगण

Society & Culture


गावोगावी असणारे आणि रोज वाढत जाणारे कचऱ्याचे डोंगर, केवळ निसर्गातच नव्हे तर थेट मानवी रक्तात पोचलेलं प्लास्टिक आणि त्यातून निर्माण झालेला समस्येचा भस्मासुर आपलं आणि येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य नष्ट करणार आहे हि भीती अनेक तज्ञ कित्येक वर्षांपासून सांगत आहेत. ह्या परिस्थितीत कचरा आणि प्लास्टिक ह्यांच्यापासून मुक्त असणाऱ्या भविष्याची शक्यता विविध उपक्रमातून प्रत्यक्षात आणणाऱ्या आदिती देवधर ह्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या कल्पक उपक्रमांसोबत अनेक लोक जोडल्या गेले आहेत. गप्पांगणच्या ह्या भागात ह्याविषयी त्यांच्यासोबत विस्तृत गप्पा मारल्या. आणखी जाणून घेण्यासाठी हा भाग नक्की ऐका आणि कसा वाटला ते कळवा.