अक्कलकोटी स्वामी निवासी@ramukti #rankuti #स्वामीसमर्थ

Share:

रामकुटी (Ramkuti)

Religion & Spirituality


अक्कलकोटी स्वामी निवासी
ब्रम्हांड नायका रक्षण करता
भक्ती तुझी भक्तांच्या अंतरी
भिऊ कशाला तू पाठी असता

मनी चिंता असते जरी
नामस्मरण करावे स्वामींचे
दुःख दूर जाते हो नामाने
हेच सत्य आहे भगवंताचे

दत्तरूपी श्री स्वामी समर्थ
मूर्तीमंत रूप तुझे देखणे
सेवा करुनी जीवनी तरुनी
आशीर्वाद द्यावा हेच मागणे

दुःख होता मार्ग दाखवा
गोडी लागली अविट खरी
उपासना करूनी स्वामींची
जाती संकटे वरचे वरी

लेखन लीलाताई वानखेडे  नाशिक
गायन डॉ.देवयानी विश्वास देशमुख, मंगळवेढा