Society & Culture
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हि बिरुदावली मिरवणारं पुणं हे त्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी, इतिहास आणि खुणा बाळगून आहे. ऐतिहासिक, शैक्षणिक, व्यापारी, राजकीय अशा अनेक ओळखी ह्या शहराला आहेत. सुप्रसाद पुराणिक हा पुण्याचा संशोधक आणि पुण्याचाही अभ्यासक. ह्या शहराच्या अंतरंगाचा अभ्यास करून त्याने ३ पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्याशी मारलेल्या गप्पांच्या पहिल्या भागात ह्या शहराच्या पूर्णपणे अज्ञात असणाऱ्या कित्येक गोष्टी त्याने सांगितल्या. पार अश्मयुगापर्यंत जाणाऱ्या पुण्याच्या पाऊलखुणा ते आजपर्यंतचा प्रवास त्याने छान उलगडून सांगितला. ह्या गप्पा जरूर ऐका , कशा वाटल्या ते नक्की सांगा.